Packaging Details
या कांद्याचा वान लाल रंगाची असुन खरीप हंगामात त्याची लागवड करता येते, कांद्याचा रंग लाल अंडाकार असुन त्याचे वजन 100 ते 110 ग्राम पर्यंत असते. कांद्याचे रोप तयार केल्यानंतर त्याची परीपक्वता कालावधी 90 ते 100 दिवसाचा असुन कांदे आकारने एकसारखे असतात विक्रीलायक कांदे 75% ते 80% असतात त्यामुळे चांगला बाजार भाव मिळतो हेक्टरी 20 ते 25 टन उत्पादन मिळते.
बीजप्रक्रीया थायरम, एम ४५, रोको, बावीसस्टीन, रेडोमील गोल्ड या पैकी एक ३ ग्राम प्रति किलो प्रमाणे बीज प्रक्रीया करावी. रोपवाटीका तयार करतांना द्यावयाची काळजी खरीप कांद्याच्या रोपवाटिकेसाठी सेंद्रिय पदार्थांनी समृद्ध, वालुकामय चिकणमातीयुक्त, पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन (सामू 6 ते 7.5) योग्य ठरते. जमिनीला किंचित उतार असावा. यामुळे पावसाच्या अतिरिक्त पाण्याचा निचरा होणे सोईस्कर ठरते. रोपवाटिकेच्या क्षेत्राची खोल नांगरणी आणि गरजेनुसार वखरणी करून घ्यावी. यामुळे जमीन भुसभुशीत होण्यासोबतच तण, बुरशीजन्य रोग व जमिनीतील किडींचा उपद्रव कमी होण्यास मदत होईल. रोपवाटिकेत विविध बुरशीजन्य रोग (रायझोक्टोनिया, फायटोप्थोरा, पिथीयम आणि फ्यूजॅरिअम इ.) येण्याची शक्यता असते.
बियाणे : एक हेक्टर क्षेत्रावर कांदा पुनर्लागवड करण्यासाठी 8-10 किलो बियाणे आवश्यक असते. पेरणीपूर्वी प्रति किलो बियाणास कॅप्टन 2-3 ग्रॅम किंवा कार्बेन्डाझिम 2-3 ग्रॅम या प्रमाणे बीजप्रक्रिया करावी. बियाणे ओळींमध्ये 1 ते 1.5 सें.मी. खोलीवर टाकावे. ओळींमध्ये 5 ते 7.5 सें.मी. अंतर ठेवावे. बियाणे टाकून त्यावर कुजलेल्या शेणखत किंवा कंपोस्ट खताच्या बारीक भुकटीचा हलकासा थर द्यावा व नंतर हलके पाणी द्यावे. रोपवाटिकेत तणांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी खुरपीच्या साहाय्याने 2 खुरपण्या प्रभावी ठरतात. तणनाशकाच्या साहाय्याने तण नियंत्रण करायचे असल्यास रोपे उगवण्यापूर्वी वाफ्यावर पेंडीमिथॅलीन 2 मि.लि. प्रति लिटर पाणी या प्रमाणे
कोड-रोग व्यवस्थापन : कांदा रोपवाटिकेसह पुनर्लागवडीमध्येही फुलकिडे ही प्रमुख कीड आहे. तिच्या नियंत्रणासाठी, फवारणी प्रति लिटर पाणी फिप्रोनिल (5 एस.सी.) 1 मि.लि. किंवा कार्बोसल्फान (25 इ ई.सी.) 2 मि.लि. पावसाळ्यात सोबत स्टिकरचा वापर करावा. काळा आणि तपकिरी करपा रोग नियंत्रणासाठी, फवारणी प्रति लिटर पाणी मॅकोझेब 2.5 ग्रॅम बियाणे टाकल्यानंतर 20 दिवसांनी 19:19:19 (एन.पी.के.) आणि सूक्ष्म अन्नद्रव्य मिश्रण (जस्त 3% लोह 2.5%, मंगल 1%, तांबे 1% आणि बोरॉन 0.5%) यांची फवारणी कमतरतेचे प्रमाण जाणून किंवा तज्ज्ञांच्या सल्ल्याने करावी. लागवडीसाठी रोपे काढण्यापूर्वी 1 ते 2 दिवसआधी हलके पाणी द्यावे. पुनर्लागवड करताना वाढलेल्या रोपांचा शेंड्याकडील एक तृतीयांश भाग कापून टाकावा. पुनर्लागवड साधारणतः रोपे 40-45 दिवसांची झाल्यानंतर त्यांची 15x10 सें.मी. अंतरावर पुनर्लागवड करतात.
खत आणि पानी व्यवस्थापन कांदा पिकाला हेक्टरी 150 किला नत्र 50 किला स्फुरद, 80 किलो पालाश आणि 50 किलो गंधकाची शिफासर केली आहे त्याप्रमाणे मार्केट मध्ये उपलब्ध इतर क्षुम द्रव्याची 10 किला एकरी 1 बॅग वारणे जरूरीचे आहे रासायणी खताचा पुरवठा 60 दिवसाच्या आतच करावा कांद्या पिकाला पाणी कमी परंतू नियमित लागते कांद्ये पोसत असतांना एकाच वेळी भरपूर पाणी दियास माना झाड होते कांया काढनिच्या 2 ते 3 आठवडे अगोदर पाणी बंद करावे.