Packaging Details
मुग (बी. एम. २००३ - २) लागवड तंत्रज्ञान : खरीप हंगामात मुग या पिकाला अनन्य साधारण महत्व आहे. या पिकाचा कालावधी फक्त अडीच ते तीन महिन्याचा असून पीक पद्धतीत या पिकाचा अंतर्भाव करण्याच्या दृष्टिने या पिकाला फार महत्व आहे. त्याच प्रमाणे या पिकाच्या शेंगा तोडणी नंतर पाला पाचोळा जमिनीत पडून जमिनीचा पोत सुधारण्यास बऱ्यापैकी मदत होते. जमिनीची सुपीकता टिकवून ठेवण्यासाठी आपल्या पिक पद्धतीमध्ये डाळीच्या पिकांचा समावेश करणे अत्यंत गरजेचे आहे. आहारामध्ये अविभाज्य घटक असलेल्या प्रथिनांचा 18 ते 20%, 56.5 % मेदाचा पुरवठा आपणास मुग पासून मिळतो आणि सर्वसाधरणपणे 20% उर्जेची गरज भागविली जाऊ शकते. जागतीक आरोग्य संघटनेने प्रतिमाणसी प्रतिदीन 85 ग्रॅम डाळींची गरज असल्याचे सांगीतले आहे. तथापी, भारतात मात्र हे प्रमाण जवळपास 1981 मध्ये 41 ग्रॅम पर्यंत घटले. देशाची डाळीची मागणी पूर्ण करण्यासाठी डाळीची आयात करावी लागत आहे. या वरुन पिक पद्धतीमध्ये मुगाची पेरणी करणे आवश्यक आहे. मुग पिकांची उत्पादकता कमी असल्याची कारणे
1. खरीप हंगामामध्ये अनियमीत पडणारा पर्जन्यमान
2. पिकासाठी जमीनीची अयोग्य निवड
3. रायझोबीयम व स्फुरद विद्राव्य जिवाणूंची प्रक्रिया केली जात नाही.
4. अपुरा निवीष्ठंचा वापर उदा. पिकांना लागणारे प्रमाणीक बियाणे, खतांची मात्रा.
5. प्रति हेक्टरी झाडांची योग्य संख्या राखली जात नाही.
6. एकात्मिक किड व रोग व्यवस्थापनाचा अभाव.
7. आंतरमशागत वेळेवर न करणे.
8. सुधारीत तंत्रज्ञानाचा अभाव.
मुग लागवड कालावधी : महाराष्ट्रात घेण्यात येणाऱ्या कडधान्यामध्ये मुग हे एक महत्वाचे पिक आहे. हे पिक 65 ते 70 दिवसात काढणीस येते. शेंगवर्गीय पिक असल्यामुळे रायझोबियम जीवाणू द्वारा जमिनीती नत्राचा साठा वाढण्यास मदत होते. त्यामुळे फेरपालटीसाठी हे पिक उत्तम आहे.
जमीन व पूर्व मशागत ः
मुग ह्या पिकाच्या लागवडी करीता योग्य निचऱ्याची मध्यम ते भारी जमीन निवडावी. एकदमच हलक्या प्रतिची मुरबाड जमिन या पिकास योग्य नाही. हे पीक पाणी साठवून ठेवणाऱ्या जमिनीत घेऊ नये. अशी जमीन एक नांगरी व 2 ते 3 कुळवाच्या पाळ्या देऊन धसकटे, काडी कचरा वेचून मे महिन्याच्या अखेर पर्यंत तयार करावी. शेवटच्या कुळवणी अगोदर 15-20 गाड्या शेण खत हेक्टरी जमिनीत मिसळावे.
पेरणीचा कालावधी :
हे पिक पाऊस पडल्यावर व जमिनीत वापसा आल्याबरोबर लवकरात लवकर पेरावी. या पिकांची पेरणी जूनच्या शेवटच्या ते जुलैच्या पहिल्या आठवड्या दरम्यान करावी. पेरणीस जस जसा उशीर होईल त्या प्रमाणात उत्पादनातही घट होत जाते.
बियाणांचे प्रमाण व बीज प्रक्रिया : एका एकर साठी मुगाचे 5 किलो बियाणे पुरेसे असून पेरणी पुर्वी बियाण्यास प्रति किलो कार्बेडेझीम 1 ग्रॅम किंवा थायरम 2 ग्रॅम चोळावे तसेच ट्रायकोडर्मा 4 ग्रॅम प्रति किलो बियाण्यास बिज प्रक्रिया केल्यास बुर्सीजन्य रोगापासून सौरक्षण होते.